favorite
close
bekwtrust.org /marathi
ट्रस्ट

मानवी जीवनाच्या कल्याणासाठी पीर-व-मुर्शिद म्हणजेच बाबाजान यांनी “बाबा एह्सानुल्ल्लाह खान वारसी ट्रस्ट” ची स्थापना केली. आणि या ट्रस्ट चे मुख्य कार्यालय आंध्रप्रदेश येथील चित्तूर जिल्ह्यात नोंदणीकृत केले गेले आहे.


लोकांच्या सोयीसाठी आणि अधिक चांगल्या सेवा त्यांच्या पर्यत पोहोचविण्यासाठी बाबाजान यांनी भारतातील विविध राज्यांमध्ये पाच शाखा ट्रस्ट ची स्थापना केली आहे. त्यांचे पत्ते संपर्क पृष्ठ मध्ये दिले गेले आहे. रोजच्या प्रार्थने बरोबरच दर महिन्याच्या २४ तारखेला (काही ठिकाणी २५ तारखेला) सामुहिक प्रार्थनेचा कार्यक्रम त्या त्या ट्रस्ट च्या शाखांमध्ये करण्यात येतो. या दिवशी स्थानिक शिष्यगण रात्री एकत्र येऊन पहाटे पर्यत सद्गुरूंची (बाबाजान यांची) प्रार्थना करतात.


दरवर्षी मुख्य ट्रस्ट आणि इतर शाखांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते. या ठिकाणी अनेक आजारांची चाचणी करून,त्यानुसार रुग्णांना आवश्यक ते औषधोपचार दिले जातात. या वैयक्तिक चाचणी आणि औषधासाठी कोणत्याही स्वरूपाचे पैसे घेण्यात येत नाही.


आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटूंबासाठी (खास करून बाबाजान यांच्या शिष्यांसाठी) ट्रस्ट ने वारसी वेलफेअर फंड (डब्ल्यू डब्ल्यू एफ) स्थापन केला आहे. या मार्फत गरजू कुटूंबांना आर्थिक मदत केली जाते.


मुख्य ट्रस्ट मदनपल्ली येथे दरवर्षी २२ ते २५ जानेवारी दरम्यान वार्षिक उरूस भरविण्यात येतो. हर प्रकारच्या जाती-धर्माचे, पंथाचे, श्रेणीचे लोक यात सहभागी होतात. निव्वळ देशांतूनच नाही तर जगाच्या विविध कोपऱ्यातून बाबाजान यांचे शिष्यगण यात सहभागी होत असतात. ही सर्व मंडळी या उरूस मध्ये एकत्र येऊन राहतात.एकाच प्रकारचे जेवण जेवतात आणि एकत्र येऊन प्रार्थना करतात. विविधतेमध्ये एकता आणि खऱ्या अर्थाने बंधु-भावाचे दर्शन या उरूस मधून घडते. त्यामुळेच हा वार्षिक उरूस एकात्मतेच्या प्रतिकाचे एक अनोखे उदाहरण आहे.


सध्याचे अध्यक्ष असलेले राह्नुमा, सजदा-नशीन आणि जा-नशीन हजरत बाबा नसीबुल्ला खान वारसी, हे मानवाच्या अध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कार्यरत आहेत. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ध्येय नजरेसमोर ठेवून या ट्रस्ट ची वाटचाल सुरु आहे.