favorite
close
bekwtrust.org /marathi
सुफीवाद
बाबा एहसानुल्लाह खान वारसी
 

एक सर्वश्रेष्ठ महान गुरु आहेत. अशा महान संतां चे वर्णन करताना कुराण मध्ये सांगितले आहे की:

أَلَا إِنَّ أَوْلِيَاءَ اللَّهِ لَا خَوْفٌ عَلَيْهِمْ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ
अला इन्ना औलिया अल्लाहू ला खौफ़ुन अलैहिम वला हुम या ज़नून
(सूरा यूनुस - वॉल्यूम / बाल 11 - आयत 2)
अर्थ: ईश्वराच्या मित्रांना ना कसले भय असते ना कसले दुःख
 
औलिया हा अरबी शब्द ‘वली’ चे अनेक वचन आहे.वली म्हणजे ईश्वराचा मित्र. हे वाचल्यानंतर तुमच्या मनांत एक प्रश्न निर्माण होईल की, ईश्वर जो प्रकाश रुपी असून अमर आहे. त्याची मातीपासून तयार होणाऱ्या आणि मातीमध्ये जाऊन अंत होणाऱ्या माणसांबरोबर कशी काय मैत्री होऊ शकते?

ईश्वराची माणसाबरोबर असलेली ही मैत्री समजुन घेण्यासाठी या संपूर्ण विश्वाची प्राकृतिक रचना कशी केली गेली आहे हे प्रथम ध्यानात घेणे योग्य ठरेल. हदीस (हजरत पैगंबर यांची वचने) आणि ऋषिमुनी व्दारे दाखविलेला मार्ग यांचा उत्तम मेळ घालून ही रचना नेमकी कशी आहे याविषयी पवित्र पुस्तक कुराण मध्ये सांगितले आहे. त्याविषयी थोडक्यात इथे पाहू या
कुराणच्या मते :
1) ईश्वराची प्रशंसा करताना:
ٱللَّهُ نُورُ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضِ ۚ
अल्लाहो नूर- उस समवाते वल अर्ध
(सूरा नूर - आयत 35)
अर्थ: ईश्वर, आकाश आणि पृथ्वीवरचा प्रकाश आहे
2) ब्रम्हांडाच्या निर्मिती आगोदर ईश्वराशिवाय काहीच नव्हते:
ٱللَّهُ ٱلَّذِى خَلَقَ ٱلسَّمَـٰوَٰتِ وَٱلْأَرْضَ وَمَا بَيْنَهُمَا فِى سِتَّةِ أَيَّامٍ
अल्लाहो लज़ी खलक-समावती वल अर्ध....
(सूरा सजदा - आयत 4)
अर्थ: ईश्वराने स्वत: हे आकाश, पृथ्वी आणि या दोन्ही गोष्टी दरम्यान जे काही आहे, ते सहा दिवसात निर्माण केले
प्रकाशाव्दारे आपली उपस्थिती दाखवून ईश्वराने या संपूर्ण ब्रम्हांडाला प्रकाशमान केले.
 
हजरत पैगंबर मोहम्मद(सल्लल–लाहो–अलेह–वसल्लम) यांच्या प्रकाशाची रचना:
 
या ब्रम्हांडाची निर्मिती करते वेळी सर्वात आधी हजरत पैगंबर मोहम्मद(सल्लल–लाहो–अलेह–वसल्लम) नावाचा एक आरसा तयार केला गेला. हजरत पैगंबर मोहम्मद यांच्या एका हदीस वरून या विधानाची साक्ष पटते.
اَوَّلُ مَاخَلَقَ اللہُ ْنُوٌریِ وَکُل الخَلَآئقَ مِن نُوٌریِ
आव्वलु मा खलकल लाहू नूरी वा कुल-लुल खलाएका मिन नूरी...
(मदारिजुन-नबुवत - पुस्तक संख्या 1 – Page-7)
अर्थ: सर्वात आधी ईश्वराने माझा प्रकाश निर्माण केला. आणि मग या प्रकाशातून सर्व जीवात्मांची निर्मिती केली.

अशा प्रकारे ईश्वराने सर्वात आधी आधी हजरत पैगंबर मोहम्मद (सल्लल–लाहो–अलेह–वसल्लम )नावाचा प्रकाश तयार केला आणि या प्रकाशामुळे हे ब्रम्हांड प्रकाशमान आहे. “मोहम्मद (सल्लल–लाहो–अलेह–वसल्लम)” हे कुणा व्यक्तीचे नाव नसुन ते या प्रकाशाचे नाव आहे. हा प्रकाश म्हणजेच ईश्वराची सावली आहे. म्हणूनच त्यांचे नाव नुसतेच मोहम्मद असे न लिहिता, त्या पुढे सल्लल–लाहो–अलेह–वसल्लम असे लिहीले जाते. “सल्लल–लाहो” चा अर्थ आहे ईश्वराचे दर्शन अथवा त्याची सावली.

 
ब्रम्हांडाची निर्मिती:
 
हजरत जाबिर यांच्या मते, एकदा त्यांनी स्वत: हजरत पैगंबर मोहम्मद यांना विचारले की, हे ! ईश्वराचे अवतार,माझ्या आई-वडिलाचे जीवन तुमच्यावर कुर्बान... पण मला सांगा की, ईश्वराने सर्वात आधी काय निर्माण केले? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, सर्वात आधी नबी (हजरत पैगंबर मोहम्मद (सल्लल–लाहो–अलेह–वसल्लम) यांच्या प्रकाशाची निर्मिती केली आणि ईश्वराच्या इच्छेनुसार हा प्रकाश कितीतरी वर्षे नक्षत्रामध्ये फिरत होता.त्या काळी ना स्वर्ग होते ना नरक, ना देवता होते ना आकाश ना पृथ्वी.

मग जेव्हा ईश्वराने ब्रम्हांडाची निर्मिती करायचे ठरविले तेव्हा याच प्रकाशा तून निर्मिती केली गेली. जसे (द्लायेल-ए–नबुवत-इमाम बहिकी मध्ये लिहिल्या प्रमाणे).अनेक तज्ञ विव्दान मंडळीनी या हदीस वर आपली पूर्ण सहमती दर्शविली आहे.

उदाहरणार्थ, इमाम इब्र-ए-हजर-मक्की यांनी अफजलुल कुरा या पुस्तकात, अल्लामा कासी यांनी अताब-ए-उल्मूसर्रत मध्ये, अल्लामा जरकानी यांनी शराह-ए-मवाहिब मध्ये, आणि अल्लामा शेखअब्दुल हक मुह्दीस देहलवी यांनी मदारी-जुल-नबुवत मध्ये अशा अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकांमध्ये या नावाजलेल्या हदीस चा उल्लेख केला आहे.

पैगंबर मोहम्मद (सल्लल–लाहो–अलेह–वसल्लम) या प्रकाशाची ईश्वरला इतकी भुरळ पडली की, या प्रकाशाची सुंदरता आणखी वाढविण्यासाठी ईश्वराने स्वत:ची उपस्थिती दाखवित या ब्रम्हांडाची निर्मिती केली. (वर उल्लेखिलेला हदीस याचा स्पष्ट पुरावा आहे). त्यामुळेच या ब्रम्हांडात असलेल्या प्राणी, झाडे, डोंगर, नद्या, मनुष्य आणि जिन या सर्वांमध्ये हजरत पैगंबर मोहम्मद यांच्या प्रकाशाचे अस्तित्व भरले आहे. आणि म्हणूनच या सर्व गोष्टींमध्ये ईश्वरी सुंदरतेच्या खाणाखुणा आढळतात.

मोहम्मद म्हणजेच ईश्वराची सावली...त्यामुळेच ईश्वराची सारी खुबी या मोहम्मद रुपी प्रकाशामध्ये भरलेल्या आहेत. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, या संपूर्ण ब्रम्हांडाची निर्मिती ही या एकाच स्रोतामधून झाली आहे. या स्त्रोताला तुम्ही प्रकाश म्हणा किंवा हजरत पैगंबर मोहम्मद (सल्लल–लाहो–अलेह–वसल्लम) यांचा प्रकाश म्हणा. आणि म्हणूनच ब्रम्हांडामधील प्रत्येक गोष्टींमध्ये ईश्वराचे अस्तित्व दडून बसलेले आहे.

(उदाहरणार्थ, मातीमध्ये बी पेरल्यानंतर ते बीज मातीशी एकरूप होऊन, एका झाडाच्या रुपात विकसित होते. तेव्हा आपल्याला ते झाड दिसत असते. त्यातले बीज काही दिसत नाही. परंतु, प्रत्यक्षात ते बीजच असते जे झाडाच्या रूपाने आपल्या समोर असते. ईश्वराचे पण तसेच आहे, तो दिसत नाही. पण त्याचे अस्तित्व त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये ठासून भरलेले असते.)

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, संसाराच्या प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचा अंश उपस्थित आहे. आणि अशा अनेक जीवांमधून ईश्वराची उपस्थिती प्रकट होत असते.जसे एक झाड ही ईश्वरची निर्मिती आहे.परंतु या झाडाची पाने, फुले, फांद्या या सर्व सुंदर गोष्टींमधून ईश्वराच्या प्रकाशाचे अस्तित्व दिसून येत असते. त्याचप्रमाणे जिवंत मनुष्यामध्ये देखील ईश्वराच्या प्रकाशाचे अस्तित्व प्रकट होत असते. आणि त्या मनुष्याच्या चाल-चलन, वागण्या- बोलण्यातून ईश्वराचे महत्व प्रकट होत असते.

असे म्हणतात की, तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये ईश्वर दडलेला असतो. प्रकाशरुपी हजरत पैगंबर मोहम्मद यांच्या गुणाच्या रुपात ईश्वराने आपले अस्तित्व जग जाहीर केले आहे. यावरून असा निष्कर्ष काढण्यात येतो की, जिथे कुठे ईश्वर उपस्थितीत आहे, तिथे हजरत पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांचा प्रकाश देखील उपस्थित आहे. यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, जेव्हापासून या ब्रम्हांडाची निर्मिती झाली आहे.आणि जो पर्यंत हे ब्रम्हांड आहे, तो पर्यंत या ब्रम्हांडाच्या आंतरिक आणि बाहय रुपात ईश्वरची उपस्थिती ही राहणारच.
अशा तऱ्हेने ईश्वर अनादी अनंत आहे.सर्व प्राणिमात्रांच्या अंतरंगात व बाह्यरूपात देखील तो आहे.

कुराण ने ही गोष्ट सिद्ध केली आहे.
هُوَ الاَوَّلُ وَالاٰخِرُ وَالظَّاهِرُ وَالبَاطِنُ ۚ وَهُوَ بِكُلِّ شَىءٍ عَلِيمٌ
हु-अव्वलो वल-आखिर हु-वल ज़ाहिर वल बातिन
(पारा - 27, आयत -3)
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर
لَامَوٌجُودِ إلّآ اللہ
ला मौजुद ईल-लल-लाह
अर्थ: ईश्वराशिवाय कुणाचेच अस्तित्व नाही आहे.
 
वाहदहु-ला-शरिका-लहु - وحدہُ لاشریک لہ :
 
ईश्वर जर अस्तित्वात नाही आहे तर,असा प्रश्न निर्माण होतो की, हे सर्व दृष्टीस पडणारे कोण आहेत?
खरे तर दृष्टीस पडणारे प्राणी हे वास्तविक नसून ती एक सावली आहे.प्रत्येक शरीरामध्ये (म्हणजेच आत्म्यामध्ये) ईश्वराचा एखादा तरी गुण असतो.जो सर्व गोष्टींसाठी जबाबदार असतो. जेव्हा हा आत्मा शरीरातून बाहेर पडतो, तेव्हा शरीराचे काहीच काम उरत नाही. यावरून हे लक्षात येते की, शरीर हे आत्म्याचे वस्त्र आहे आणि आत्मा (ईश्वराचा गुण) हा शरीराच्या अस्तित्वासाठी जबाबदार आहे.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, ईश्वर सोडून कुणाचेच अस्तित्व नाही आहे. या संदर्भात एक हदीस देखील आहे–
"युग को बुरा मत कहो युग अल्लाह है"
قَالَ اللَّهُ عَزَّ وَجَلَّ يُؤْذِينِي ابْنُ آدَمَ، يَسُبُّ الدَّهْرَ وَأَنَا الدَّهْرُ، بِيَدِي الأَمْرُ، أُقَلِّبُ اللَّيْلَ وَالنَّهَارَ
(हदीस बुखारी –Volume 2 - पेज - 913) - (अल-सहीह-बुखारी-शरीफ़ ४८२६ - किताब ६५ - हदीस ३४८)
आप (सल्लाहो अलेह वसल्ल्म) ने कहा, अल्लाह फ़रमाता है, आदम के वंशज मुझे दुख देते हैं जब वह युग को बुरा भला कहते हैं. जबके मैं ही युग हुं. मेरे हाथ मैं हर चीज है. मैं ही दिन और रात का चक्र चलाता हुं.

या धारणेला सुफी नुसार वहद्तुल-वजूद म्हणतात. आणि ज्याला हे रहस्य समजले की, ईश्वराशिवाय इतर कुणाचेच अस्तित्व नाही किंवा सर्व प्राणी हे ईश्वरानेच निर्माण केले आहे.तोच खऱ्या अर्थाने एक ईश्वरवाद किंवा वाहदहु–ला-शरिका लहू चा अर्थ समजू शकतो.
 
आदम अलैहिस्सलाम (मनु महाराज) यांची रचना:
 
सुरुवातीला, आदम ची रचना करतेवेळी, ईश्वराने हजरत पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांचा प्रकाश ठेवला आणि सर्व देवी–देवतांनी या प्रकाशाला नमस्कार करायला सांगितले.

हजरत पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांच्या प्रकाशातून आदम अलैहिस्लाम, त्यांच्यातून हा प्रकाश पुढे त्यांचा मुलगा शीश (अलैहिस्लाम) मध्ये आला.या तऱ्हेने एका युगातुन दुसऱ्या युगात असे करीत एक दिवस हा प्रकाश हजरत अब्दुला यांच्याकडे जाऊन पोहोचला. हजरत अब्दुला यांच्याकडून पुन्हा एकदा हजरत पैगंबर मोहम्मद (स.अ.व.) यांच्यामध्ये एकरूप झाला. या संदर्भात एक हदीस आहे:
بُعِثْتُ مِنْ خَيْرِ قُرُونِ بَنِي آدَمَ قَرْنًا فَقَرْنًا، حَتَّى كُنْتُ مِنَ الْقَرْنِ الَّذِي كُنْتُ فِيهِ
(हदीस बुखारी –Volume 2 - पेज - 325) से लिया गया
अर्थ: ईश्वराने मला अएका पाठोपाठ प्रत्येक युगात निर्माण केले आणि मग या युगात माझा पुन्हा जन्म झाला
 
पवित्र पैगंबर यांचा पुनर्जागरण:
 
महान संत पैगंबर यांचा जन्म १९ एप्रिल ५७१ मध्ये झाला.आदमप्रमाणे तुम्हीदेखील जन्मापासून पैगंबर होतात.मानवी रुपात आपले नाव सल्लम होते.तर अलौकिक रुपात आपले नाव मोहम्मद आहे. आपल्या आईचे नाव बीबी सकीना होते.वयाच्या ४० व्या वर्षी हिरा नावाच्या गुहेतून मोह्म्म्द च्या रुपात प्रकट झालात.
 
पैगंबर (सल्लल-लाहो–आलेह–वसलम) मोहम्मद यांच्या व्यक्तीमत्वातच ईश्वराच्या महानतेचे दर्शन आहे
 
मानवी उत्कर्षासाठी हजरत पैगंबर यांचा जन्म झाला असून, विश्वासाठी ही असामान्य स्वरुपाची अशी घटना आहे. या घटनेमागचा मतितार्थ समजून घेणे आणि तो जगाला समजावून सांगणे हे वाटते तितकेसापे नाही. ज्या प्रमाणे एका काचेवर पारा चढवून त्यापासून आरसा तयार होतो, त्याच. प्रमाणे आपण हिराच्या गुहेतून बाहेर आल्यावर मोहम्मदच्या रुपात प्रकाशित झालात.
 
 
पैगंबर (सल्लल-लाहो–आलेह–वसलम) व्यक्तित्व म्हणजेच मोहम्मद (स.अ.व) यांचा प्रकाश आहे: हदीस कडून पुष्टी:
 
आपले व्यक्तिमत्व म्हणजे मोहम्मद(स.अ.व) चा प्रकाश आहे: हदीस च्या दृष्टीने वर उल्लेखिलेल्या हदीस नुसार एक गोष्ट स्पष्टपणे जाणविते की, सर्वात आधी ईश्वराने त्यांचा प्रकाश निर्माण केला. मग या प्रकाशातून अन्य इतर प्राण्यांची निर्मिती झाली. यावरून हे सिद्ध होते की, पैगंबर मोहम्मद (सल्लल–लाहो–अलेह-वस्ल्लम) यांचा आत्मा हा खऱ्या अर्थाने मोहम्मद ((सल्लल–लाहो–अलेह-वस्ल्लम) यांचा प्रकाश आहे. ते इतके महान आहेत की, तेच फक्त परम देवत्वाच्या जागेवर पोहचू शकले जिथे आतापर्यंत कुणीही पैगंबर, इतकेच काय जीब्रैल देखील तिथे पोहचू शकले नाहीत.यावरूनच लक्षात येते की, पैगंबर मोहम्मद यांचा दर्जा अति उच्च आणि वेगळ्या पातळीवरचा आहे.
 
पैगंबर (सल्लल-लाहो–आलेह–वसलम) व्यक्तित्व म्हणजेच मोहम्मद (स.अ.व) यांचा प्रकाश आहे: कुराणकडून पुष्टी:
 
अल्लाह कुरान में कह्ता है:
يَا أَهْلَ الْكِتَابِ قَدْ جَاءكُمْ رَسُولُنَا يُبَيِّنُ لَكُمْ كَثِيرًا مِّمَّا كُنتُمْ تُخْفُونَ مِنَ الْكِتَابِ وَيَعْفُو عَن كَثِيرٍ قَدْ جَاءكُم مِّنَ اللَّهِ نُورٌ وَكِتَابٌ مُّبِينٌ
कद-जा-अकुम मिन-अल्लाहि नूर व-किताबुन मुबीन
(सूरा अल-मायीद; Para – 6; verse_15)
अर्थ: निश्चित स्वरुपात एक प्रकाश (आप सल्लाहो अलैह वसल्लम) आला आणि स्पष्ट पुस्तक (पवित्र कुरान)
या आयात मधून स्पष्टपणे लक्षात येते की, पैगंबर मोहम्मद यांचे जीवन आचरण म्हणजेच पवित्र कुराण होय.ते वाचून देखील जो कुणी त्यांना या प्रकाशाच्या स्वरुपात स्वीकारू शकत नाही, ती लोक निश्चितपणे भरकटलेली आहेत.
وَمَآ اَرْسَلْنٰـکَ اِلَّا رَحْمَةً لِّلْعٰلَمِيْنَ
वमा अर-सलनाक अल्लहे रहमतुल लिल-आलमीन
(सूरा अम्बियाह Verse_107)
अर्थ: सर्व जगाला रहमत म्हणजेच कृपेची बरसात करण्यासाठी या भूतलावर पाठविण्यात आले आहे
या आयात नुसार ईश्वराने सर्व चराचर सृष्टीमध्ये रहमत म्हणजेच आपल्या आशिर्वादाची कृपा करण्यासाठी पैगंबर मोहम्मद यांना निर्माण केले. परंतु एक मानव सर्व चराचर सृष्टीसाठी कसा काय आशिर्वाद होऊ शकतो. पण या वाक्यातूनच लक्षात येते की, पैगंबर मोहम्मद यांचे व्यक्तित्व हे प्रकाशरुपी आहे. आणि म्हणूनच त्यांना शान–ए–लाहूती म्हणजेच सर्व चराचर सृष्टीवर ज्याचे प्रभुत्व आहे असा तो, असे म्हटले गेले आहे.

पैगंबर मोहम्मद यांचा अध्यात्मिक दर्जा अति उच्च स्तरावरचा आहे. त्यामुळेच त्यांचा आत्मा हा प्रकाशरूपी बनला आहे.दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, ईश्वराची हुबेहूब प्रतिमा म्हणजेच आरसा.अशी व्यक्ती जी ईश्वराचे प्रतिनिधीत्व करीत आहे.आणि म्हणूनच त्यांच्या नावापुढे सल-लल-लाहू-अलैहे–व-सल्लम असे लिहिले जाते. याचा अर्थ ईश्वराचे दर्शन होणे होय.

कारण या आधी होऊन गेलेल्या नबीमध्ये पैगंबर रुपी प्रकाशाची उपस्थिती जाहीररित्या समोर आली नव्हती.म्हणूनच ईश्वराने त्यांना खातिमुल-नबी म्हणजेच शेवटचे पैगंबर म्हटले आहे.त्याचबरोबर सिराजून-मुनिरा(परम ज्योत) अशी देखील आपली ओळख सांगितली जाते. अशी ज्योत जी पूर्ण ब्रह्मांडाला आणि त्याचबरोबर मानवी हृदयाला देखील प्रकाशमान करीत आहे.

यासंदर्भात स्पष्टीकरणासाठी एका प्रसिद्ध घटनेचा इथे उल्लेख केला आहे:

पैगंबर मोहम्मद यांनी, ते वापरत असलेला अंगरखा, त्यांच्या मृत्यूनंतर इराणच्या करनी गावात रहात असलेल्या हजरत ओवेस नावाच्या माणसाला द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हजरत अली आणि उमर, करनी गावात आले. हजरत ओवेस यांना भेटून त्यांच्या येण्यामागचे कारण सांगितले. आणि तो पवित्र अंगरखा हजरत ओवेस यांच्या हाती दिला. त्या अंगरख्याला स्पर्श करताच ओवेस यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. नि ते म्हणाले, तुम्ही कधी पैगंबर यांना पाहिले आहे का? त्यांचा तो प्रश्न ऐकून उमर थोडेसे चकितच झाले. कारण त्यांनी आपला जीवनातला बराचसा काळ पैगंबराबरोबर घालविला होता. तर हजरत ओवेस यांनी त्यांच्या आयुष्यात कधी पैगंबराना बघितले देखील नव्हते.

त्यांनी विचारलेला हा प्रश्न विचार करण्याजोगा होता. कारण ओवेस हे पैगंबरापासून खूप लांब अशा गावात राहत होते. त्यांनी आपल्या आयुष्यात कधी त्यांना पहिले देखील नव्हते. पण त्यांची भक्ती इतकी सच्ची होती की, त्यांनी न भेटताही ते पैगंबरांच्या खूप जवळ होते. त्यांच्या या निरपेक्ष भक्तीमुळे खुश होऊन पैगंबरानी आपला अंगरखा त्यांना देण्याची इच्छा व्यक्त केली. पैगंबराच्या जवळ असलेली माणसे आणि मनाने त्यांच्या जवळ असलेली माणसे ह्यात खूप मोठा फरक असतो. आणि म्हणूनच ओवेस यांचा हा प्रश्न इथे महत्वपूर्ण ठरतो.
 
पैगंबर मोहम्मद (स.अ.व) हे सर्वव्यापी आहेत
 
पैगंबर यांचा प्रकाश हा सर्वव्यापी आहे म्हणजेच ईश्वरची छाया किंवा जमाल-ए–अल्लाह अर्थात सर्वव्यापी आणि अमरत्व प्राप्त झालेले असे त्यांचे वर्णन केले जाते. ज्या प्रकाशातून त्यांचे व्यक्तीमत्व बनले ते अनादी अनंत आहे. आणि हेच त्यांच्या ह्यातून–नबी चे रहस्य आहे. म्हणजेच या पवित्र नबीचे शरीर अदृश्य आहे. परंतु ज्या सुफी संताना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे, त्यांनाच हे ह्यातून–नबी चे रहस्य समजू शकते. म्हणूनच पैगंबराना सल-लल-लाह असे म्हंटले जाते. सल-लल-लाह म्हणजेच ईश्वराचे दर्शन.

पैगंबरांची अध्यात्मिक उंची उच्च दर्जाची असून, त्याबाबत विशेष स्तुती कुराण मध्ये केली आहे:
اِنَّ اللّٰهَ وَ مَلٰٓىٕكَتَهٗ یُصَلُّوْنَ عَلَى النَّبِیِّ
इन्नल्लाहा मलाय-ए-कतहु यसल-लूनल-नबि
(सूरा अहज़ाब - पारा 22 - अनुच्छेद 56)
अर्थ: ईश्वर आणि सर्व इष्ट देवी-देवता पैगंबराना आपला नमस्कार पाठवितात. तेव्हा ईश्वाराना मानणाऱ्यानो तुम्ही देखील तुमचा नमस्कार पैगंबर यांना पाठवा

आपले नाव मोहम्मद (सल्लल-लाहो-अलेह-वसलम) याचा अर्थ असा आहे की, ज्यांची सर्वात जास्त स्तुती केली जाते असे व्यक्तीम्त्व. कुराणच्या या आयातवरून लक्षात येते की, ईश्वर देखील आपल्या सर्व देवदुतासह पैगंबर यांची प्रशंसा करतात. आणि त्यांना आशिर्वाद व नमस्कार पाठवितात. त्यांचे व्यक्तिमत्व हे प्रकाशरुपी असून, हा प्रकाश दिव्य दृष्टीतून निर्माण झाला आहे.म्हणूनच त्यांची या जगातल्या प्रत्येक गोष्टीवर हुकुमत आहे.

परंतु पैगंबरानी या जगात एका मानवी रुपात जन्म घेतला, म्हणून त्यांना शान-ए–नासुती अर्थात असे व्यक्तिमत्व जे प्रकाश आणि दिव्य दृष्टीने परिपूर्ण आहे, असे म्हटले जाते.

थोडक्यात सांगायचे झाले तर, दिव्यतेच्या बाबतीत पैगंबर हे अलौकिक आहेत, त्यामुळेच या जगासाठी ते सर्वश्रेष्ठ संत ठरतात.
पैगंबर मोहम्मद (स.अ.व) हे नुसतेच महामानव नाहीत तर ते प्रकाशमान रुपी आहेत. याच कारणांमुळे त्यांची सावली कधी दिसत नाही. या बाबतीत मानवीं मेंदू किंवा प्रगत विज्ञान नेमके स्पष्टीकरण देऊ शकतील काय, जी व्यक्ती पंच तत्वांनी बनली आहे, त्या व्यक्तीची सावली कशी पडू शकत नाही.
आणखी एक प्रश्न, त्यांच्या घामाला एक अलौकिक असा सुगंध येत असे. मग जो मानवी रुपात आहे, त्याच्या घामाला कसा काय सुगंध येऊ शकतो?
याच प्रकारे कोणताही कीटक त्यांच्या पवित्र शरीराला स्पर्श करू शकत नसे. हे असे का, याचे उत्तर कुणी देऊ शकेल काय?
पैगंबर मोहम्मद (स.अ.व) हे ईश्वराच्या व्यक्तीमत्वाचा पहिला पडदा आहे. म्हणूनच या महा मानवाचा आत्मा हा प्रकाशरूपी आहे. जसे तलवार आणि तिला असलेली धार, या दोन गोष्टी वेगळ्या असल्या तरी त्या एकरूप आहेत. या दोन्ही गोष्टी वेगळ्या काढू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे, ईश्वर आणि पैगंबर मोहम्मद ही नावे जरी वेगळी असली तरी रूप एकच आहेत.

म्हणूनच पवित्र कुरणात सांगितले आहे की:
पैगंबराबाबत दाखविलेली निष्ठा म्हणजेच ईश्वरापर्यंत पोहोचलेली निष्ठा असेल. (सूरा निसा आयत-८०)
पैगंबर मोहम्मद (स.अ.व) यांचे काम म्हणजेच ते ईश्वराचे काम असणार. (सूरा अल-अनफाल-आयत -१७)
पैगंबर मोहम्मद (स.अ.व) यांनी दिलेली दीक्षा म्हणजेच ईश्वराने दिलेली दीक्षा होय. (सूरा अल-फतह आयत -१०)
ज्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात स्वतः ईश्वर आहे, ज्या प्रकाशाचा ईश्वर चाहता आहे, अशा व्यक्तिमत्वाला एक मानव कसा काय समजू शकतो. म्हणूनच म्हटले आहे की:
आंख वाला तेरे जोबन का तमशा देखे : दीदाय-ए-कोर को क्या आये नज़र क्या देखे
(अर्थ: जसे प्रकाशाच्या उपस्थितीत आपण सर्व गोष्टी पाहू शकतो, त्याचप्रमाणे जो आत्मा स्व्यप्रकाशी आहे, अलौकिक अशा दिव्यत्वाने भरलेला आहे, त्याचे व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आत्मज्ञानाचा साक्षात्कार होणे आवश्यक आहे)
 
उच्चतम विनम्रता (अदा-ए-मारफ़ना):
 
या विश्वाचे सोंदर्य हे पैगंबर यांच्या प्रकाशातून निर्माण झाले आहे. आणि याच प्रकाशमध्ये सर्व गोष्टींच्या ज्ञानाचा समावेश आहे. हा प्रकाश अनादी अनंत असल्यामुळे तो हर प्रकारच्या कार्यासाठी सक्षम आहे.

सर्व शक्तिमान, अलौकिक दिव्यतेने परिपूर्ण असे आपले व्यक्तिमत्व असून देखील, आपण लोकांमध्ये वावरताना एक माणूस म्हणूनच वावरलात. त्यामुळेच तुमच्यात दडलेल्या या महानतेला आमचा प्रणाम.परंतु, अशी काही लोक आहेत, जी तुमच्यामधील या महानतेला समजू शकली नाहीत. आणि म्हणूनच ते तुम्हाला त्यांच्या प्रमाणे एक माणूस समजतात.
قُلْ إِنَّمَآأَنَا بَشَرٌ مِّثْلُكُمْ يُوحَىٰٓ إِلَىَّ أَنَّمَآ إِلَٰهُكُمْ إِلَٰهٌ وَٰحِدٌ ۖ
कुल इन-नमा अना बशरुन मिस्लुकुम युहा इल्लाह्या
(सूरा कहफ़ वोल १६ वर्स ११)
अर्थ: मी तुमच्यासारखाच माणूस आहे, पण माझ्यावर देवी कृपेचा वरदहस्त आहे


निश्चितपणे आपण या धरतीवर एका मानवी रुपात जन्म घेतला.नुसताच जन्म घेतला नाही तर अनेक दुखद व कठीण परिस्थितीचा सामना देखील केला. कारण मानव जातीला मार्गदर्शन करण्यासाठी ते गरजेचे देखील होते. कोणत्याही समाजाचा उद्धार करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मानवी रुपात येणे आवश्यक होते.आणि म्हणूनच तुम्ही मानवी रुपात इथे अवतरलात.

परंतु त्यांचे व्यक्तिमत्व खरे तर पैगंबर मुहम्मद (सल्लल-लाहो-अलेह-वसल्लम) नूर आहे, वरील भागात सिद्ध झाले आहे. दुर्दैवाने उलामा (इस्लामचे ज्ञान असलेले विद्वान) वर लिहिलेल्या कुराणच्या त्याच श्लोकाच्या उत्तरार्धाकडे लक्ष देत नाहीत ज्यात म्हटले आहे की "देव माझ्यावर उतरला आहे" जे तुम्हाला इतर कोणत्याही मानवांपेक्षा श्रेष्ठ बनवते. थोडक्यात, पैगंबर मुहम्मद यांचे व्यक्तिमत्व हे मुहम्मद (सलाल-लाहो-अलेह-वसल्लम) यांचे नूर आहे, म्हणून त्यांच्याकडे शान-ए-लाहुती (दैवी शक्ती) आहे, आणि या विश्वातील प्रत्येक दृश्य-अदृश्य गोष्टीची त्यांना जाणीव आहे. , आणि ईश्वरवेश. (विमान) तुमच्यावर उतरतात.

आपल्यामध्ये असे गुण आहेत का?
निश्चितपणे या प्रश्नांचे उत्तर नाही हेच असेल. कारण ईश्वरांच्या सर्व देवदुतांचा एक खास असा दर्जा आहे. आणि त्यातही पैगंबरांची शान आणि अध्यात्मिक उंची ही सर्व देवदुतापेक्षा ही उच्च पराकोटीची आहे. म्हणूनच पैगंबर मोहमद यांची तुलना सर्व सामान्य माणसां बरोबर करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

या संदर्भात एक विशिष्ट विचार असा देखील आहे की, सर्व प्राणीमात्रांच्या आत्म्यामध्ये ईश्वराचा एक गुण वसलेला आहे.परंतु, पैगंबरांचा आत्मा हा इतरांपेक्षा पूर्णतः वेगळा आहे.कारण तो ईश्वररुपी प्रकाशातून तयार झालेला आहे.
 
परम ज्योत (सिराजुन मुनिरा):
 
जसे सूर्य आपल्या प्रकाशाच्या सहाय्याने या सृष्टीतील अंधकार नष्ट करतो, त्याचप्रमाणे पैगंबर यांचे प्रकाशरूपी व्यक्तिमत्व मानवी मन आणि आत्म्यावर निर्माण झालेला अंधकार दूर करून त्यांना आपल्या प्रकाशाच्या सहाय्याने उजळवून टाकीत आहे.

या प्रकाशरूपी उर्जेसाठी हजरत अली हे देखील तितकेच योग्य व्यक्तिमत्व आहे, हे पैगंबर मोहमद यांना जाणविले. आणि त्यांनी या उर्जेने हजरत अली यांना देखील प्रकाशमान केले. या संदर्भात एक हदीस प्रसिद्ध आहे:
اَنَا مدِینَۃُ العِلمِ وَعَلِیّ بَابُھَا
अना मदीनतल-इलम व अली बाबहा
अर्थ: मी ज्ञानाचे शहर आहे आणि अली म्हणजे त्याचे दार आहे
 
مَنْ کُنْتُ مَوْلاهُ، فَهَذَآ ٌعَلِىٌّ مَوْلاهُ
मन कुनतो मौला फ़-अली मौला
अर्थ: मी ज्यांचा ज्यांचा मौला आहे, अलीदेखील त्यांचे मौला आहेत

आत्म्यांना प्रकाशरूपी करण्याचे हे कार्य वारसा परंपरे नुसार सुरूच आहे.पैगंबर मोहम्मद (स.अ.व) यांच्या पासून निर्माण झालेला हा प्रकाश अली साहेब तिथून पुढे वेगवेगळ्या सुफी संतांकडे जात आहे.आणि जो पर्यंत या जगाचे अस्तित्व आहे, तो पर्यंत हा सिलसिला सुरूच राहणार आहे. आणि म्हणूनच पैगंबर यांच्या नंतर नबी म्हणून अवतार घेण्याची गरज उरली नाही.
 
विलायत:
 
पवित्र कुराण मध्ये सांगितले आहे की:
قَدْ أَفْلَحَ مَنْ تَزَكَّى
कद-फ़लाह मन-तज़क्का
(सूरा अल-आला: पारा ३०; वर्स १४)
अर्थ: ज्याचे मन स्वच्छ, साफ असते, तोच आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचू
इथे मनाची स्वच्छता म्हणजेच अहंकारावर जसे क्रोध, लोभ, इर्ष्या, द्व्वेष, अभिमान आदी गोष्टीवर मात करणे होय. आणि हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा तुम्ही एखाद्या संत किंवा गुरूच्या सानिध्यात राहतात. त्यांना मनापासून शरण जातात.तेव्हाच तुम्ही या विकारांवर विजय मिळवू शकता.
 
भगवंतात विलीन होऊन भगवंतात अमर होणे (फ़ना-फ़िल्लाह और बका-बिल्लाह):
 
प्रार्थना आणि प्रयत्नाच्या जोरावर जेव्हा एखादा साधक आपल्या अहंकारावर मात करतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की, अहंकाराचे महत्व शून्य असून, प्रत्यक्षात त्याचा काहीच उपयोग नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, शिष्याने अहंकारावर नियंत्रण मिळविले तर साक्षात मृत्यूला तो सामोरा गेला.म्हणूनच खऱ्या मृत्यू आधी मृत्यूला प्राप्त करणे (फना–फिलाह)असे देखील म्हणतात. अशा एखाद्या शिष्यामध्ये जेव्हा त्यांचे गुरु पैगंबरांचा प्रकाश ठेवतात, तेव्हा त्या शिष्याचा आत्मा देखील प्रज्वलित होतो. पवित्र कुराण मध्ये याचे वर्णन अनंत अस्तित्व किंवा अमरत्वाला “फल्लाह” प्राप्त करून जीवनात यशस्वी होणे असे सांगितले आहे.

एक आत्मा जो पैगंबराच्या प्रकाशाने प्रज्वलित झाला आहे, त्यात ईश्वराचे अनेक गुण सामाविलेले असतात. म्हणूनच अशी व्यक्ती आपल्या शरीरापासून मुक्त होऊन पूर्ण ब्रम्हाडावर राज्य करू शकते. अशी व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या कार्यासाठी स्वत:च्या.शरीरावर किवा इंद्रियांवर अवलंबून नसते.त्यांच्या शिवाय देखील तिचे कार्य होत असते. कारण ही सर्व कार्ये त्या सर्व शक्तिमान प्रकाशाव्दरे होत असतात.
فَإِذَا أَحْبَبْتُهُ، كُنْتُ سَمْعَهُ الَّذِي يَسْمَعُ بِهِ، وَبَصَرَهُ الَّذِي يُبْصِرُ بِهِ، وَيَدَهُ الَّتِي يَبْطِشُ بِهَا، وَرِجْلَهُ الَّتِي يَمْشِي
इज़ा अहब-बतु कुन्तो समाउ...
(मिशकात-ए-हक़्कानिया Page 197) - हदीस २५ - "४० हदीस-ए-क़ुदसी"
याचा अर्थ असा की, जेव्हा एखादा मनुष्य प्रार्थना,चांगली कर्में आणि अथक परिश्रमाव्दारे माझ्याजवळ येऊन पोहोचतो, तेव्हा ईश्वरच त्याची दृष्टी बनते आणि या दृष्टीने तो जवळच्या आणि दूरच्या गोष्टी सहजपणे पाहू शकतो. मग ईश्वरच त्याचा कान बनतो, जेणेकरून तो ऐकू शकतो. व ईश्वरच त्याचे हात–पाय बनतात.थोडक्यात, अशी व्यक्ती ईश्वर रूप बनते. जसे ईश्वर पूर्ण ब्रम्हाडाला पाहू शकतो, तसेच हा ईश्वर रुपी मनुष्य देखील एका कोपऱ्यात बसून संपूर्ण चराचर सृष्टीला पाहू शकतो.

या संदर्भात एक हदीस आहे:
الْمُؤْمِنِ فَإِنَّهُ يَنْظُرُ بِنُورِ اللَّهِ
अल मोमिनु यनज़ैरु बिनुरिल्लाह
तर्मिज़ी हदीस क्रमांक: ३४
अर्थ: मोमिन ईश्वराच्या प्रकाशातून बघतो
जेव्हा एखाद्या साधकाचा आत्मा पैगंबराच्या प्रकाशाने प्रज्वलित होतो तेव्हा त्यास ईश्वराची मैत्री किंवा विलायत असे म्हणतात. आणि जो पैगंबराच्या प्रकाशाला प्राप्त करतो त्याला वली म्हणजेच ईश्वराचा मित्र असे म्हणतात.

जेव्हा एखाद्या साधकाचा आत्मा पैगंबराच्या प्रकाशाने प्रज्वलित होतो तेव्हा त्यास ईश्वराची मैत्री किंवा विलायत असे म्हणतात. आणि जो पैगंबराच्या प्रकाशाला प्राप्त करतो त्याला वली म्हणजेच ईश्वराचा मित्र असे म्हणतात. जो आत्मज्ञानी असतो तो आपल्या ज्ञानाच्या बळावर सर्व जगाला बघू शकतो. या संदर्भात एका प्रसिद्ध घटनेचा इथे उल्लेख करावासा वाटतो.

नावाजलेल्या खंदकच्या लढाईच्या वेळेचा प्रसंग आहे. मौला अली समोर शत्रू सैन्याचा सेनापती उमर-बिन-अब्दुल–वुद होता. त्याचा पाठलाग करता करता. मौला अलींनी त्याचा भाला हिसकावून घेतला. आणि त्या भाल्याने त्याला मारण्याऐवजी तो हवेमध्ये एका विशिष्ट दिशेने फेकला.

ते पाहून काहीश्या चिडलेल्या स्वरात त्याने मौला अलींना विचारले की, या अली ! त्या भाल्याने मला मारण्याऐवजी, तो हवेमध्ये का फेकून दिलात? हा साधासुधा भाला नसून खानदानी भाला आहे. आमच्यासाठी तो पदाकाप्रमाणे आहे. आणि आम्ही सर्व या भाल्याचा खूप आदर करतो.

त्या भाल्यासाठी अस्वस्थ झालेल्या उमर-ची अवस्था पाहून मौला अलींना खरे सांगावे लागले की, ते म्हणाले, ज्या वेळेला मी तो भाला उचलला त्यावेळी समुद्रातल्या एका तळाशी असलेल्या छोट्या मासळीने मदतीसाठी माझा धावा केला.एक मगर तिला खाण्यासाठी येत होती. आणि ते पाहून ती मासळी म्हणाली, ”या अली मदत करा.वाचवा मला.” तो आवाज ऐकून मी तो भाला तिच्या दिशेने येणाऱ्या मगरीच्या दिशेने फेकला.

ऐन युद्धाच्या वेळी मौला अलींनी केलेल्या या दिव्य कार्यावरून लक्षात येते की, त्यांना दिव्य शक्तींचे किती अगाध ज्ञान असेल ते.

इथे काही प्रश्न निर्माण होतात की, ते एका मासळीचा आवाज कसा काय ऐकू शकतील? आणि मादिन्या पासून तर समुद्र खूप लांब होता. मग अशी कोणती शक्ती होती की, जिच्यामुळे त्या मासळीचा आवाज मौला अली पर्यत पोहचू शकला. इथे मौला अलीची भूमिका खूप महत्वपूर्ण आहे. कारण शत्रू सैन्याबरोबर लढत असताना देखील त्यांनी एका छोट्या मासळीची मदत केली. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, या घटनेमागे निश्चितपणे एक अदभूत अशी शक्ती आहे.

प्रत्यक्षात ही शक्ती म्हणजे पैगंबराचा प्रकाश होता. त्यांच्या प्रकाशाशिवाय ही अशक्य घटना शक्य झाली नसती. हाच तो प्रकाश आहे, जो ईश्वराच्या पैगंबराव्दारे प्रकट झाला. तेव्हा तो मोजिजा म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि हा जेव्हा औलिया–ए-करम व्दारा प्रकट झाला, तेव्हा करामत (चत्मकार) म्हणून ओळखला जाऊ लागला. अशा अनेक करामती आपल्याला ईश्वरांच्या मित्रांव्दारे म्हणजेच वलीव्दारे केलेल्या आढळून येतात. जर एखादा वली अशक्य गोष्ट शक्य करू शकतो तर, प्रत्यक्षात ज्यांचा नूर आहे ते पैगंबर स्वत: किती शक्तिमान असतील, याची यावरून कल्पना करता येईल.

 
औलिया-ए-कराम (ईश्वरांच्या मित्रांची) ची अप्रत्यक्ष अवस्था:
 
औलिया-ए–कराम विषयी सांगताना पैगंबर मोहम्मद यांनी म्हटले आहे की,
اِنَّ اَوُلِیَآ ئِیٌ تَحُتَ قَبَآئِیٌ لاَ یَعٌرِ فُھُم غَیِرِیٌ۔
इन्ना औलिया तहत-किबाली ला यरिफ़ुहुम ग़ैरी
(संदर्भ: असरार-ए-हकिकी, ख्वाजा मो‌इनुद्दीन चिश्ती अजमेरी ग़रीब नवाज़)
अर्थ: माझे मित्र माझ्या पोशाखात आहे.कुणीही त्यांना समजू शकत नाही.पण मी मात्र त्यांना ओळखू शकतो.

या संसारिक जीवनात अनेक संत,मुनी,म्हणजेच ही वली मंडळी मानवी रुपात दृष्टीस पडतात. परंतु, प्रत्यक्षात ती पैगंबरांच्या प्रकाशाचे प्रतिरूप आहेत. त्यांचा आत्मा पैगंबरांच्या प्रकाशाशी एकरूप झाला आहे. म्हणूनच त्यांच्या व्दारे जे चमत्कार घडतात, ते प्रत्यक्षात या पैगंबररुपी प्रकाशामुळेच घडतात. परंतु, दुर्देवाने आपण सामान्य माणसे हा प्रकाश पाहण्यास असमर्थ आहोत. पण जेव्हा एका वीजेमधून दिवा पेटतो किवा पंखा सुरु होतो, त्यावेळी आपल्यला वीजेची खऱ्या अर्थाने जाणीव होते. त्याचप्रमाणे जेव्हा संत मंडळी अथवा वलीव्दारे करामत घडते, त्यावेळी दिव्य प्रकाशाची अनुभूती होते. म्हणूनच गुरूंकडे जाणे, त्यांची प्राथना करणे आणि जीवनाच्या संकटकाळी त्यांचा धावा करणे हे या प्रकाशाला प्राप्त करण्याचे मार्ग आहेत. प्रत्यक्षात हेच वास्तव असून यात बहुदेववादाचा प्रश्नच निर्माण होत नाही.
 
समाधी स्थळ आणि दर्ग्याना भेट देणे:
 
प्रत्येक वलीचा आत्मा हा पैगंबरांच्या प्रकाशाशी एकरूप झालेला असतो. त्यामुळे पैगंबराच्या अंगी असलेले सर्व गुण त्यांच्यामध्ये एकरूप होऊन जातात. व तेदेखील त्याच्या प्रमाणे सर्व शक्तिमान आणि अमर बनतात. त्यामुळे जेव्हा त्यांचे निर्वाण होते, त्यानंतर देखील त्यांच्या मध्ये असलेल्या प्रकाशामुळे ते माणसांच्या उत्कर्षासाठी कार्यरत राहतात.

म्हणूनच त्यांच्या समाधी स्थळांवर अथवा दर्ग्यावर प्राथना करणे म्हणजेच एक प्रकारे या प्रकाशाची प्राथर्ना करणे होय. परंतु, काही मंडळी या वास्तवाला नीटसमजून घेत नाही.आणि उगीच नसत्या शंका निर्माण करतात.त्यांना शिर्क किंवा बहुदेववादी असे म्हणतात. पण जे प्रार्थना करायला येतात, त्यांनादेखील या वास्तवाची नेमकी जाणीव नसते. म्हणूनच प्रत्येकाने या प्रकाशामागचे खरे वास्तव जाणून ज्ञानी बनले पाहिजे.

या आगोदर सांगितल्याप्रमाणे जसे पैगंबरांचा प्रकाश त्यांच्या पासून हजरत अलींकडे आणि मग पुढे अलीमार्फत विविध वलीं कडे पोहोचला. म्हणूनच सुफी संतांमध्ये हा पैगंबरांचा प्रकाश प्रकाशमान झालेला आढळतो. जसे काब्याच्या दिशेने केलेला नमस्कार हा थेट ईश्वराला पोहोचतो. अगदी त्याच प्रमाणे या सुफी संत मंडळीना केलेला नमस्कार हा थेट पैगंबरांच्या प्रकाशाला पोहोचतो. म्हणूनच या संत मंडळीना नमस्कार करणे म्हणजे पैगंबरांना नमस्कार करण्यासारखे आहे.

लक्षात ठेवा:
खऱ्या ईश्वराचा शोध घेणे, हे मानवी जीवनाचे उद्देश्य आहे. आणि गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय यात यश मिळणे अशक्य आहे. म्हणून सद्गुरू मिळणे ही खूप महत्वपूर्ण घटना आहे. पण दुःखाची गोष्ट अशी की, आजकाल सच्चा गुरु लाभणं हे खूपच अवघड होऊन बसलय. ज्यांना ईश्वर भक्तीचे ज्ञानदेखील नाही, अशी अनेक मंडळी स्वत:ला गुरु स्थानी बसवित आहे. नी लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत आहे. म्हणूनच तुमच्या गुरुंना जाणून घ्या, पारखून घ्या. कारण एक उत्तम गुरूच आपल्या शिष्यासाठी काय योग्य ते जाणून त्याला त्याच्या ध्येयापर्यंत सहजपणे पोहचवू शकतो. म्हणूनच नवशिक्या गुरु मंडळीं पासून सावधान.
 
सुफीवादाची मूलतत्त्वे

सुफीवादाची संकल्पना समजून घेण्यासाठी, एखाद्याला त्याच्या सभोवतालची मूलभूत आणि मूलभूत तत्त्वे/परिभाषा समजून घेणे आवश्यक आहे. हे सर्व घटक आणि संज्ञा एका सोप्या प्रश्न आणि उत्तर स्वरूपात वेगळ्या पृष्ठावर परिभाषित केल्या आहेत. सुफीवादाची मूलतत्त्वे पृष्ठास भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.