favorite
close
bekwtrust.org /marathi
स्वागत...
 
महान संतांची भूमी अशी भारत देशाची जगभरात एक खास ओळख आहे. अनेक अवतारी संत अथवा अध्यात्मिक गुरु या देशात होऊन गेले. आजच्या काळातील सर्व श्रेष्ठ संत किंवा महान अध्यात्मिक गुरु म्हणून हज़रत बाबा एह्सानुल्लाह खान वारसी यांच्याकडे बघितले जाते. नबी पवित्र पैगंबर (स.अ.व) यांनी अशा स्वरूपांच्या संतांचे वर्णन करताना म्हटले आहे की.
عُلَمَاءُ اُمَّتِی کَاَنْبِيَاءِ بَنِی اِسْرَائِيْل
उलमा‌ए उम्मती का-अमबिया बनी इज़राइल
(मुनाकिब-ए-गौसुल आज़म बहवाला फ़ैज़ान-ए-सुन्नत)
अर्थ: विद्वान (संत, फकीर, औलिया-ए-कराम) मंडळी यांचा दर्जा हा बनी इस्त्राएल च्या नबी सारखाच आहे
 
प्रारंभिक वर्ष:
 
हज़रत बाबा एह्सानुल्लाह खान वारसी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बलुवा नावाच्या एका छोट्या गावात झाला. त्यांचा जन्म ईशाच्या नमाज (रात्रीच्या प्रार्थनेचा काळ) च्या सुमारास २४ सप्टेबर १९२५ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव "हजरत अब्दुल्लाह खान" तर आई चे नाव "बीबी जमीलुन्निसा" होते.

सृष्टीतील दिव्य आणि अलौकिक शक्तीचे वरदान जन्मत:च त्यांना लाभले होते. लहानपणापासून ते शांत, एकांतप्रिय आणि धैर्यशील होते. लहान वयातच ते एक असामान्य अवतारी पुरुष आहेत याची झलक दिसून यायची. ही गोष्ट फार कमी संतांमध्ये आढळते. गावामध्ये आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर, १९४६ मध्ये ते नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आले. मुंबईत आल्यावर इथे पालिकेच्या शाळेत प्राथमिक “शिक्षक” म्हणून रुजु झाले. आणि पुढे कायमस्वरूपी मुंबईत स्थायिक झाले.

लहानपणापासून त्यांच्यावर हजरत पवित्र पैगंबर (सल्लाहो अलय्है वसल्लम) यांच्या शिकवणुकीचा खूप प्रभाव होता. इतके ते त्यांच्या विचारांशी एकरूप झाले होते कि, पूर्ण कुराण त्यांना अवगत होते.
لَّقَدْ كَانَ لَكُمْ فِى رَسُولِ ٱللَّهِ أُسْوَةٌ حَسَنَةٌ
लकद काना लकुम फ़ि रसूल अल्लह अस्वाते हुस्ना
अर्थ: हजरत पवित्र पैगंबर (स.अ.व) यांचे जीवन तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असे उदाहरण आहे

आपल्या जगण्यातून हजरत पवित्र पैगंबर (स.अ.व) यांनी जीवन कशा तऱ्हेने जगावे, याचे एक उदाहरण लोकांसमोर ठेवले होते.त्यांनी आखुन दिलेल्या विचारा नुसार आपण देखील जीवन जगावे, यासाठी बाबाजान यांचा प्रयत्न असे. लहानपणापासून ते अल्लाच्या नमाजमध्ये तल्लीन झालेले दिसायचे. त्यांच्या या गुणांमुळेच त्यांचे गुरु त्यांना मौलवी म्हणून हाक मारायचे. मौलवी म्हणजे अशी व्यक्ती जी धर्माच्या आणि संस्कृती च्या नियमानुसार पूर्णपणे जीवनाचा अवलंब करते. त्यांना नमाज म्हणजेच प्रार्थनेविषयी इतका जिव्हाळा होता की, ते नेहमी पवित्र आणि स्वच्छ रहात असत. पाच वेळा नमाज पढण्याबरोबर ते इलावा तह्जूद म्हणजे मध्यरात्री ची प्रार्थना आणि चाश्त व ईश्राक म्हणजे पहाटेच्या वेळेची प्रार्थना देखील ते करीत असत. आपली नमाज म्हणण्याची वेळ त्यांनी कधीच चुकविली नाही. याबाबतीत ते इतके काटेकोर होते की, मशिदीमध्ये ते दिसताच लोकांना घड्याळात नेमके किती वाजले हे समजत असे.
 
वारसी वंश परंपरेत त्यांचा प्रवेश:
 
जन्मापासूनच ते एक महान वली (संत) आहे. त्यांना अध्यात्मिकतेच्या प्रवासात हजरत अल्लामान शाह वारसी (रहमतुल्लाह अलैह) यांच्याकडून दीक्षा प्राप्त झाली. ते देखील दिव्य शक्तीनी युक्त असे महान व्यक्तिमत्व होते. हजरत अल्लामान शाह वारसी (रहमतुल्लाह अलैह) यांना हजरत सिद्दीकशाह वारसी (रहमतुल्लाह अलैह) आणि हजरत सिद्दीकशाह वारसी (रहमतुल्लाह अलैह) यांना वारसी वंशाचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरु हजरत वारिस अली शाह (रहमतुल्लाह अलैह) यांच्या पासून दीक्षा प्राप्त झाली होती.

हजरत अल्लामान शाह वारसी (रहमतुल्लाह अलैह) यांच्या बरोबरच्या पहिल्याच भेटीत बाबांना दीक्षा प्राप्त झाली होती. या दीक्षा प्रक्रियेच्या वेळी बाबांना त्यांचे गुरु खाने-काबा येथे प्रार्थना करताना दिसले होते. ईश्वर ओढीची आस इतकी तीव्र होती की, बाबाजान यांना दीक्षेच्या पहिल्याच क्षणांतच ती दृष्टी प्राप्त झाली होती. जी अनेकांना कित्येक वर्षे तपश्चर्या करून देखील प्राप्त होत नाही.

दीक्षा प्राप्त झाल्यावर अल्पावधीतच बाबाजान यांनी अध्यात्मिक क्षेत्रात इतकी प्रगती केली की, त्यांना "कामिल विलायत" (संपूर्ण ज्ञानी) ची उपाधी देण्यात आली. परमात्मा ने आपल्याला अध्यात्मिक ज्ञानाने विभूषित केले आहे. आणि या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करावा असा संकेत दिला.या संकेतानुसार आपण आपले जीवन मानवी कल्याणासाठी आणि समाजोध्दारासाठी समर्पित केले.
 
दक्षिण क्षेत्री रवाना:
 
आपल्या गुरु आज्ञेनुसार बाबाजान हे दक्षिण भारत क्षेत्राकडे रवाना झाले. त्याकाळी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागसलेला प्रदेश म्हणून दक्षिणेतल्या राज्यांची ओळख होती.याशिवाय या क्षेत्रा मध्ये काळ्या जादूचा प्रभाव देखील जास्त होता. गावागावांमधून यात्रा करताना बाबाजान यांनी लोकांना अध्यात्मिकतेचे उपदेश दिले. पुढे ईश्वरी संकेतानुसार १९७८ साली आंध्र प्रदेशामधील चित्तुर जिल्ह्यातील मदनपल्ली नावाच्या गावात शहरी वस्तीपासून दूर, कद्री रोडवरील टोमॅटो मार्केटच्या समोरील, एका टेकडीवर असलेली जागा विकत घेतली. आज हेच ठिकाण ट्रस्ट चे मुख्यालय म्हणून ओळखले जाते. आणि याच ठिकाणी बाबाजान यांची मजार-ए-मुबारक अर्थात पवित्र समाधी मंदिर आहे. (बाबाजान यांनी ८ जानेवारी १९९६ रोजी, रात्री १० वाजुन १३ मिनिटांनी समाधी घेतली होती.)

इस्लामी महिन्यानुसार, दरवर्षी १६ शाबान सूर्यास्तानंतर कुल–शरीफ चा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाव्दारे बाबाजान यांचे सर्व शिष्यगण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. कुल-शरीफ चा हा कार्यक्रम मुख्य ट्रस्ट मदनपल्ली बरोबर इतर सर्व ट्रस्टमध्ये देखील साजरा करण्यात येतो. याशिवाय दरवर्षी २२ ते २५ जानेवारी दरम्यान बाबाजान यांचा वार्षिक उरूस साजरा करण्यात येतो. उरुसाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २५ तारखेला पीर-ओ–मुर्शिद म्हणजेच बाबाजान यांचा सात रंगी झेंडा चढविला जातो. या सात रंगी झेंड्याबरोबर हजरत पवित्र पैगंबर (स.अ.व) यांचा हिरवा आणि वारिस पाक बाबा यांचा पिवळा झेंडा देखील चढविण्यात येतात. परमात्म्याने सात रंग आणि त्यांचा अनुक्रम बाबाजान यांच्या समोर प्रकट केले होते. या संदर्भात अधिक निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात येते की, यातला प्रत्येक रंग हा ईश्वरी दिव्य गुणांचा प्रतिक आहे. यावरून असे समजते की, या ईश्वरी गुणांचे बाबाजान हे खऱ्या अर्थाने अधिकारी आहेत.

तज्ञ मंडळीच्या मते, तुम्ही एक प्रकाशमान आणि परम शक्तीमान, सामर्थ्यवान असे व्यक्तिमत्व आहात. आणि सर्व गूढवादी शक्तींवर आपले वर्चस्व आहे. या बाबतीत अधिक सखोल निरीक्षण केल्यानंतर असे लक्षात येते की, आपण नूर-ए–मुस्तफ़ा (सर्व शक्तीमान प्रकाश) आहात. जेव्हा हा प्रकाश आदम अलैहिस्लाम यांच्या मध्ये ठेवण्यात आला, तेव्हा ते सर्व जीवांमधील सर्वोत्तम जीव (अशरफुल-मखलुक) म्हणून ओळखले गेले. त्यामुळे सर्व देवी-देवतांनी त्यांना नमस्कार केला आणि आशिर्वाद पाठविला. जेव्हा हाच नूर-ए–मुस्तफ़ा (सर्व शक्तीमान प्रकाश) हजरत पवित्र पैगंबर (स.अ.व) यांच्या रूपाने जगजाहीर झाला, तेव्हा संपूर्ण सृष्टीतील एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि सर्व पैगंबरांचे "मुख्य" असा किताब त्यांना मिळाला. हाच नूर-ए–मुस्तफ़ा (सर्व शक्तीमान प्रकाश) जेव्हा पीर-ओ–मुर्शिद अर्थात बाबाजान यांना मिळाला, तेव्हा आपण ईश्वराच्या खजिन्याचे “खजिनदार” तर झालात, पण हजरत पवित्र पैगंबर (स.अ.व) यांच्या प्रेमाचे मानकरी देखील बनलात.
बाबाजान यांनी आपल्या उपदेशाने शिष्यांची मने तर प्रज्वलित केली आणि त्यांच्या मनांत ईश्वर हा काबा, मंदिर, चर्च मध्ये नसून तो माणसांच्या हृदयात आहे. जी लोक खऱ्या अर्थाने ईश्वराच्या जवळ जातात, त्यांच्यामध्ये त्या परमात्म्याचे प्रतिबिंब पाहता येते, असा विश्वास निर्माण केला.

प्रेम, ज्ञान आणि स्नेह यांचे महान प्रतिक म्हणजे पीर-ओ-मुर्शिद अर्थात बाबाजान. समोरच्याला मोहित करणारा तुमचा स्वभाव, कोमल ह्रदयी आणि दुसऱ्याच्या ह्रदयाला देखील निर्मळ करणारी तुमची दृष्टी, या आपल्या गुणांच्या जोरावर तुम्ही समाजामध्ये आणि मानवी जीवनामध्ये सहज रीतीने अध्यात्मिक विकास घडवून आणला.
 
पीर-व-मुर्शीद यांचे उपदेश:
 
सुफी तत्वांवर आधारित अशी बाबाजान यांची शिकवण आहे. ते म्हणतात, प्रत्येक माणसाने खऱ्या अर्थाने सद्गुरूंचा शोध घेऊन त्यांच्या चरणात स्वत:ला समर्पित केले पाहिजे. जेणेकरून मनुष्याला ईश्वर प्राप्ती होईल आणि जो गुरु मनुष्याच्या मनाची सफाई करून, त्याला ईश्वराची ओळख करून देतो, त्यावेळी माणसाच्या जीवनाचे लक्ष्य खऱ्या अर्थाने पूर्ण होते.

आपण आपल्या शिष्यांना सांगितले आहे की, रोज रात्री झोपण्या पूर्वी दिवसभरातील तुमच्या घडामोडींचा आढावा घ्या. जर चांगल्या गोष्टी तुमच्याकडून घडल्या असतील तर त्यासाठी ईश्वराचे आभार माना आणि वाईट किंवा चुकीच्या गोष्टींसाठी क्षमा मागा. जेणेकरून भविष्यात अधिक चांगल्या तऱ्हेने काम करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे वाईट कर्मापासून स्वत:ला वाचवू शकाल. मनुष्याने त्याला नेमून दिलेली कर्तव्ये उत्तम रीतीने पार पाडली पाहिजेत. समाज व निसर्गा विषयी नेहमीच चांगल्या भावना ठेवल्या पाहिजेत.

ईश्वर सतत तुमच्या सोबत असतो, हे लक्षात ठेवूनच माणसाने घमेंड, अहंकार, भेदभाव आणि लोभ अशा वाईट गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. दुसऱ्यांमधील दोष शोधण्यापेक्षा, स्वत:मध्ये कशाची कमतरता आहे, ते बघितले पाहिजे. आणि त्यानुसार सुधारणा केल्यास, तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल, या गोष्टींवर नेहमी विशेष जोर देऊन बाबाजान सांगत असत.

म्हणूनच आपल्या सर्वांसाठी बाबाजान यांनी उपदेश दिला आहे की, "प्रेम हेच आपले कर्तव्य आहे". कारण प्रेम हेच या ब्रम्हांडामधील सृष्टीसाठी कारणीभूत आहे आणि प्रेमानेच तुम्ही इतरांना जिंकू शकता. प्रेमानेच तुम्ही भक्ती करून ईश्वर प्राप्ती करू शकतात.
 
पीर-व-मुर्शीद यांचे उद्धरण:
 
आपल्या शिष्यांच्या कल्याणासाठी आणि सुधारणेसाठी, बाबाजनांनी अनेक उपदेश दिले आणि एक चांगला माणूस बनण्याचे सोपे मार्ग दाखवले. काही अवतरण वेगळ्या पानावर दिले आहेत.
बाबाजानचे अवतरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
मानव जातीसाठी पीर-ओ-मुर्शिद यांचे मिशन:
 
आपण नेहमी मानवी जीवनाच्या कल्याणाचा विचार केला आहे. मानवी जीवनाचे कल्याण होण्यासाठी तुम्ही ३ मुख्य नियम सांगितलेले आहेत:
१) उगीच वायफळ बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा. कारण प्रत्यक्ष कृतीमधूनच नेमक्या ध्येयाकडे पोहोचता येते.
२) प्रत्यक्ष उपदेश करण्यापेक्षा योग्य उदाहरणांच्या माध्यमातून प्रचार केला पाहिजे.
३) समस्या निर्माण होऊ नये म्हणून परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणली पाहिजे.
 
आपल्या वचनानुसार, जर ईश्वराने कधी माणसांमध्ये भेदभाव निर्माण केला नाही.हवा, पाणी, प्रकाश सर्वासाठी समान आहे.जन्म आणि मृत्यु देखील सर्वांसाठी समान आहे.म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने लक्षात घेतले पाहिजे की, सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. अन्यथा आपण आपल्या जीवनाचे लक्ष्य (ईश्वराच्या निकट जाणे) प्राप्त करण्यास सक्षम होणार नाही.

सर्व प्राणी ईश्वराच्या परिवारातील सदस्य आहेत, या गोष्टींचा जेव्हा मनुष्य स्वीकार करेल, तेव्हाच आपण ईश्वराचे वारस आहोत हे अधिकार वाणीने सांगू शकेल. तुमच्या मिशनचे उद्देशदेखील हेच आहे कि, सर्व माणसांमध्ये एकी निर्माण करणे.लोकांच्या हृदयात परमात्म्याच्या प्रकाश (नूर-ए–इलाही) चे अस्तित्व दाखवून देणे. या परमात्मा रुपी प्रकाशाच्या अस्तित्वाची ओळख करून वेगवेगळ्या स्वरूपातील धार्मिक भेदभावांचा अंत करून लोकांमध्ये समानता निर्माण करणे आणि त्यांच्या मनांत देशभक्तीची भावना निर्माण करणे.

ईश्वराचे प्रेम खऱ्या अर्थाने ह्रदयात उतरल्या नंतरच एक माणूस दुसऱ्या माणसांशी प्रेमाने वागू शकतो. भारतामध्ये अनेक सुफी संतांनी ज्ञानांचा हाच मार्ग निवडला. त्यामुळेच त्यांच्या धार्मिक स्थळांवर प्रत्येक जाती धर्माचे लोक भेट देतात आणि अध्यात्मिक व सामाजिकदृष्ट्या लाभान्वित होतात.

लोकांच्या सोयीसाठी बाबाजान यांनी भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या आश्रमांची स्थापना केली आहे. जिथे हजारो लोक भेट देतात आणि संसारिक व अध्यात्मिक कृपा प्रसादाचा लाभ घेतात. या आश्रमांचे पत्ते संपर्क पृष्ठांवर दिलेले आहेत.

बाबाजान यांच्या मते, चमत्कार हे दिव्य खेळणं असतं आणि ईश्वर अशी खेळणी निर्माण करून एक प्रकारे खेळतच असतो. त्यामुळे प्रत्येकाने चमत्काराचा दिखावा करणाऱ्या शक्तीपासून सावध राहिले पाहिजे. आणि लोकांनी देखील निसर्ग नियमानुसार या चमत्कारांचा विचार करून समजून घेतला पाहिजे. आपण असेही म्हणतात की, हजरत पवित्र पैगंबर (स.अ.व) यांना मानणे आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टीनुसार चालणे, हाच खूप मोठा चमत्कार आहे. तसे पाहिले तर, कधी कधी आपण देखील आपल्या शिष्यांच्या आत्मविश्वासा साठी दैवी चमत्कार केलेले आहेत. जसे एका क्षणी शिष्यांच्या मदतीसाठी तुम्ही लगेच समोर आलात आणि त्याची मदत करून अचानक गायब झालात. तुम्ही म्हणता की, तुम्ही रोज तुमच्या शिष्यांना भेटतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर बाबाजान यांनी त्यांच्या शिष्यांना पुराव्यानिशी हे सिद्ध करून दाखविले आहे की, जिथे शिष्य आहे तिथे गुरु आहे. म्हणजेच जिथे माणूस असतो तिथे ईश्वर हा असतोच.
 
 
पीर-ओ-मुर्शिद यांचे पाक जीवन आणि तत्त्वांवर लिहिलेली पुस्तके:
 
गुरूची कृपा मिळवण्यासाठी त्या गुरूची आसक्ती असणे आवश्यक आहे. गुरूंच्या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेतल्यावर आसक्ती होईल. म्हणूनच पीर-ओ-मुर्शिद यांचे पाक जीवन, शिकवण आणि ईश्वराचे रहस्य यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. जसे की 'इसरार-ए-इलाही', 'कमियाब मोआलिम आणि आध्यात्मिक रहनुमा', 'फ़ायल-ए-हक्की', 'नजराना-ए-अकीदत' आणि 'आयना-ए-रब'. 'आयना-ए-रब' हे पीर-ओ-मुर्शीद यांचे संपूर्ण चरित्र आहे, ज्यामध्ये तुमचा ऐहिक वैभव, तुमचे राहणीमान आणि अनेक चमत्कारही सांगितले आहेत. हे पुस्तक पीर-ओ-मुर्शिद यांच्या सजदा-नशीन आणि जा-नशीन हजरत बाबा नसीबुल्ला खान वारसी यांच्याकडून कोणत्याही शाखेच्या ट्रस्टमध्ये मिळू शकते.